Breaking

हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणावर चाकू हल्ला, तिघांवर गुन्हा

Updated: ऑगस्ट 31, 2025

By Vivek Sindhu

15 08 2024 knife attack2

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार : तालुक्यातील वारणी येथे पैशाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरेंद्र भागवत जायभाये (वय २३, रा. पिंपळनेर, ता. शिरूर कासार) याने दिलेल्या तक्रारीनुसार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो वारणी येथील मातोश्री हॉटेलमध्ये टीव्ही पाहत बसले होता. यावेळी पैशाच्या कारणावरून आरोपींनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. 

यावेळी सारंग दिंगाबर बडे (रा. वारणी) याने शिवीगाळ करून चिथावणी दिली. त्यानंतर शुभम बाळु केदार आणि हानु रमेश केदार (दोघे रा. वारणी) यांनी शिवीगाळ करत फिर्यादीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या हातावर आणि पाठीवर वार झाले व तो गंभीर जखमी झाला.

या प्रकरणी तिन्ही आरोपींवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि जाधव करत आहेत.


Categories

Recent Posts