Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका : अपहरणकर्ता पोलिसांच्या ताब्यात

Updated: फेब्रुवारी 20, 2026

By Vivek Sindhu

अपहरणकर्ता पोलिसांच्या ताब्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- आई-वडील घरी नसताना ब्युटीपार्लरला जाते. असे सांगून घरा बाहेर गेलेली १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी, ही बेपत्ता झाली होती. तिचा पोलिसांनी तपास घेऊन तिला पळवून नेणाऱ्या युवकासह ताब्यात घेत तिची सुटका केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावातील १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी ही तिचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्या नंतर बेपत्ता झाली होती. आई-वडील घरी आल्या नंतर ती अल्पवयीन मुलगी घरी आढळून आली नाही. म्हणून त्यांनी चौकशी केली असता त्या दिवशी ती ब्युटीपार्लरला जात असल्याचे सांगून बाहेर गेली असल्याचे समजले. तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. म्हणून मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून अल्पवयीन मुलीचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार युसुफ वडगाव पोलिस दि. २१ जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. 

त्या वरून गु. र. नं. २०/२०२६ भा न्या सं १३७(२) नुसार अज्ञात व्यती विरुद्ध अज्ञात कारणासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी तपास करून अल्पवयीन मुलीचे अपहरणकर्ता सतीश निवृत्ती उजगरे (रा. पारडी माटेगाव ता. वडवणी) याला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या जवाबा वरून सतीश उजगरे याच्या विरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध करणे यासह पॉक्सोच्या कलम वाढ करण्यात आली आहे.

अपहरणकर्त्याला न्यायालया समोर हजर केले असता त्याला दि. २७ फेब्रुवारी पर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


Categories

Recent Posts