Breaking

कॅन्सर जनजागृतीसाठी रोटरीने काढला लॉगमार्च

Updated: नोव्हेंबर 11, 2025

By Vivek Sindhu

कॅन्सर जनजागृतीसाठी रोटरीने काढला लॉगमार्च

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सामाजिक संस्थांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- समाजात कॅन्सर या रोगाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी उपचारानंतर हा आजार पुर्णतः बरा होतो. हा संदेश देत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीने कॅन्सर जनजागृतीसाठी शहरात लॉगमार्च काढून आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला.
रोटरी क्लबच्या वतीने रोटरी रन कॅन्सर जनजागृती हा उपक्रम राबविण्यात आला. कॅन्सर या आजाराची जनजागृती करण्यासाठी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलिस स्टेशन या अंतरात शहरवासीयांचा लॉगमार्च काढण्यात आला. या लॉगमार्चचे उद्घाटन लातूर येथील प्रसिद्ध कॅन्सर रोग तज्ञ डॉ.अजय पुनपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पोलिस निरिक्षक शरद जोगदंड, रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोहिणी पाठक, उपाध्यक्ष धनराज सोळंकी, सहसचिव राधेशाम लोहिया, डॉ.नवनाथ घुगे, संतोष मोहिते, कल्याण काळे विजयसिंह ठाकुर, हर्षर्वन वडमारे, राजेंद्र घोडके, भारतीय जैन संघटनेचे आदेश कर्नावट यांच्या उपस्थितीत या लॉगमार्चचा प्रारंभ झाला. कॅन्सर जनजागृतीचे विविध फलक हातात घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातून ही रॅली काढली. रॅलीचा समारोप पोलिस स्टेशन येथे झाला. यावेळी अनेकांनी कॅन्सर जनजागृतीसाठी रोटरी क्लबला आर्थिक मदत केली. रोटरी क्लबच्या वतीने कॅन्सर रूग्णांची पुर्व तपासणी करण्यासाठी रोटरी क्लब मोबाईल व्हॅन उभी करणार आहे. यासाठी हा मदत निधी जमा करण्यात येत असल्याचे रोटरी क्बलच्या अध्यक्षा रोहिणी पाठक यांनी सांगितले. यावेळी कॅन्सर या आजारातून मुक्त झालेल्या रूग्णांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी त्यांच्या अनुभवाचे कथनातून जनजागृती केली. यावेळी रोटरी क्बलचे सदस्य, भारतीय जैन संघटना, स्व.प्रमोदजी महाजन नर्सिंग कॉलेज, कै.बाबुराव घुले नर्सिंग कॉलेज, गंगा नर्सिंग कॉलेज, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी योगा सोहम योगा क्लास काळवटी मुडमॉर्निंग ग्रुप यांच्यासह शहरातील सामाजिक संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या.

कॅन्सर उपचारानंतर बरा होतो- डॉ.अजय पुनपाळे

कॅन्सर हा आजार उपचारानंतर पुर्ण पणे बरा होतो. यासाठी शरिरात होणार्‍या बदलांवर लक्ष ठेवा. या आजाराची लागन होत असल्याबद्दल प्राथमिक लक्षणे आढळुन येताच उपचार घ्या. यातून कॅन्सर पुर्णपणे बरा होतो. असे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ.अजय पुनपाळे यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना कॅन्सरच्या आजारासंदर्भातील संपुर्ण माहिती उपचार पद्धती घ्यावयाची काळजी व प्राथमिक लक्षणे याची सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ.नवनाथ घुगे यांनी कॅन्सर विरूद्धची लढाई ही केवळ उपचारांची नाही तर जनजागृकतेची आहे. असे आवाहन केली.


Categories

Recent Posts