Breaking

केज येथील रास्ता रोको प्रकरणी बाळराजे आवारेसह ३३३ जणांविरुद्ध गुन्हा

Updated: ऑक्टोबर 15, 2025

By Vivek Sindhu

केज येथील रास्ता रोको प्रकरणी बाळराजे आवारेसह ३३३ जणांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – कोरडेवाडी येथील साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मंगळवारी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साडेचार तास रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी ३३३ जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुभाष रसाळ, अमोल भिमराव पाटील, योगेश शिवाजी मनेरी (दोघे रा. कोरडेवाडी), संदिप चाळक (रा.लव्हुरी), संभाजी आघाव, विशाल कुटे (दोघे रा. परभणी), अण्णासाहेब जाधव (रा. परळी वै.), संतोष प्रल्हाद यादव, मदन आश्रुबा यादव, विक्रम अभिमान शिंदे, उस्मान मोहम्मद शेख, दत्ता यादव, दादाराव हिम्मत कोरडे, अनिल कोरडे, बाबा शेख, गंगाधर अप्पा यादव, बळीराम भिमराव यादव, मारुतित्रिंबक तेरवे, अशोक धोंडीबा वरपे, सुदाम नागोराव कोरडे, संजय जालींदर गिरी, संतोष वेताळ, पप्पु जयवंता शिंदे, बाजीराव बाबुराव कोरडे, हुसैन अमिन शेख, प्रमोद राजेंद्र कोरडे, शरद नारायण कोरडे, अशोक विष्णु यादव, उमेश शिवाजी वरपे, धनराज दादाराव वरपे, अशोक बन्सी यादव (सर्व रा. कोरडेवाडी) यांच्या कोरडेवाडी गावातील २०० ते ३०० महिला व पुरुषांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यांना आंदोलनापासुन अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. व्यंकटराम, तहसीलदार राकेश गिड्डे, पोलीस निरीक्षक स्वनिल उनवणे, जलसंपदा खात्याचे अधिकारी कमलाकर ढाकणे यांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आंदोलन चालू ठेवून आंदोलना दरम्यान बाळराजे आवारे पाटील व इतर ५ ते ६ जणांनी त्यांचे अंगावर डिझेल ओतूनन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत प्रशासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. तर स्वप्निल वरपे याने विष प्राशान करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर बाळराजे आवारे पाटील यांनी तुमची भुमीका जाहीर करा नाही तर आम्ही १० मिनिटात आमचा निर्णय घेवु, गनीमी कावा करु असे म्हणत आंदोलनकर्त्यांसह ५ वाजता तहसिल कार्यालयात जाऊन बसले. तर येणारी – जाणारी वाहने अडवून पादाचारी लोकांची अडवणुक करुन विनापरवाना रास्तारोको केला. अशी तक्रार फौजदार सुकुमार बनसोडे यांनी वरील ३३३ लोकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल आहे.

बसचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

रास्ता रोको आंदोलन करीत असतना संदिप चाळक (रा.लव्हुरी), विशाल कुटे (रा. परभणी) या दोघांनी रास्तारोको आंदोलन दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीच्या लातूर – पाटोदा (एम. एच. १४ एमएच १५५९), अहमदपूर – चाळीसगाव (एम. एच. १४ एमएच ६५२२), उदगीर – गंगापूर (एम. एच. १४ एमएच ८९३८), गंगाखेड – आळंदी (एम. एच. १४ बीटी ३९६४), (एम. एच. २० बीएल २१०८) या बसच्या समोरील काचावर दगडफेक करून १ लाख रुपयांचे नुकसान केले. तर बसमधील चालक वाहन आणि प्रवासी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होणारी कृती केली. धारूर एसटी बस आगाराचे प्रमुख नवनाथ चौरे यांच्या फिर्यादीवरून बाळराजे आवारे पाटील, संदीप चाळक, विशाल कुटे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts