Breaking
Updated: सप्टेंबर 5, 2025
केज शहरात ईद ए मिलादनिमित्त जुलूस मिरवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज शहरात मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादनिमित्त हजरत खाँजा बाबा दर्ग्यापासून जुलूस मिरवणूक ही प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली.
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती व ईद ए मिलाद निमित्त ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता केज शहरातील हजरत खाँजा बाबा दर्ग्यापासून जुलूस मिरवणूकीस सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रोजा मोहल्ला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळंब रोडवरून परत दर्गा येथे समारोप करण्यात आला. मिरवणुकीत लहान मुले, मुलीसह तरुण, जेष्ठ नागरिक हे पारंपरिक पेहराव करून सहभागी झाले होते. या मिरवणुकीत फराळ, फळे, खाद्य पदार्थ व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, फौजदार सुकुमार बनसोडे, फौजदार उमेश निकम, फौजदार जावेद कराडकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.