केज – केज येथे माहेश्वरी समाज बांधवानी महेश जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण करीत रक्तदान शिबिर घेतले.
केज शहरातील क्रांतीनगर भागातील माहेश्वरी समाजाच्या स्मशानभूमीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजित ढोपे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करून ५१ वृक्षांचे रोपण करण्यात आले.