Breaking

कवडगावात मध्यरात्री दरोडा; ११ लाखांचा मुद्देमाल लंपास

Updated: ऑक्टोबर 29, 2025

By Vivek Sindhu

द्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी : वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे मध्यरात्री अनोळखी ५ ते ६ चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तब्बल अकरा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी वडवणी पोलिसात गु.र.नं. २६१/२०२५ भादंवि कलम ३१०(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बबन घुराजी मांजरे (वय ४५, व्यवसाय शेती, रा. कवडगाव, ता. वडवणी, जि. बीड, जात मातंग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री अंदाजे २.३० ते ३.०० च्या सुमारास अनोळखी ५ ते ६ इसमांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. फिर्यादी यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी कपाटाचे लोखंडी रँड तोडले व त्यातील नगदी रक्कम तसेच हॉलमधील पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख २ लाख ९० हजार रुपये असा एकूण ११ लाख २० हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीस नेला.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि वर्षा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.


Categories

Recent Posts