Breaking
WhatsApp Group
Join Nowआरोपीला पोलीस कोठडी
केज – कपडे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गुरे चारणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करीत न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
केज तालुक्यातील हंगेवाडी शिवारातील तळ्यावर एक १२ वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी ही २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेली होती. ती कपडे धुवत असताना शेजारी गुरे चारीत असलेला नवनाथ ज्ञानोबा काशिद याने तेथे कुणी नसल्याची संधी साधून त्या अल्पवयीन मुलीच्या हाताला धरून शेजारच्या खड्ड्यात नेवून तिच्यावर अतिप्रसंग करीत लैंगिक अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून नवनाथ ज्ञानोबा काशिद याच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारसह पोक्सो, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी नवनाथ ज्ञानोबा काशिद याला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी केज येथील न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्यास २९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.
Last Updated: June 28, 2025