Breaking
Updated: ऑक्टोबर 31, 2025
बोरगावमध्ये भरदिवसा फोडले घर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड (प्रतिनिधी) – कुमशी येथील कदम डेअरी फार्ममधून तब्बल १ लाख ३२ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेअरी मालक रविंद्र कोंडीराम कदम (वय ४४, रा. जिजाऊ नगर, जुना धानोरा रोड, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष खराबे आणि त्याचे दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री सुमारास (१.३० वाजता) कुमशी येथील कदम डेअरी फार्म येथे घडली. फिर्यादी यांच्याकडे म्हशींसाठी खुराक आणण्याचे काम संतोष खराबे हा कामगार पाहत होता. त्याने दोन अज्ञात साथीदारांना बोलावून घेतले व तिघांनी मिळून डेअरीतील रोख रक्कम चोरून नेली. या चोरीत ५०० रुपयांच्या २६४ नोटा, एकूण १ लाख ३२ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे फिर्यादीने सांगितले.
घटनेनंतर फिर्यादी आज दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार जाधव तपास करीत आहेत.