Breaking

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा गेवराई दौरा

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा गेवराई दौरा

WhatsApp Group

Join Now

रेशीम शेती, रोहयो कामांचा आढावा; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

गेवराई – बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवारी (२ जुलै) गेवराई तालुक्यातील रुई, सिसरदेवी आणि गढी परिसराला भेट देत विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. रेशीम शेती प्रकल्प, रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या भौतिक सुविधांची पाहणी करताना त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

रुई येथील ग्रामपंचायत कार्यालयास भेट देत रेशीम शेतीचे प्रात्यक्षिक व उत्पादनाचे स्वरूप पाहिले. यावेळी त्यांनी शाश्वत शेती आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने रेशीम शेती महत्वाची भूमिका बजावू शकते, असे प्रतिपादन केले. रोहयो योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची तपासणी करताना त्यांनी कामाच्या गुणवत्तेची आणि वेळेत पूर्णतेची खातरजमा केली.

यानंतर त्यांनी सिरसदेवी ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा आढावा घेत तेथील स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी तपासली. योजनेची यावेळी गटविकास अधिकारी मीना कांबळे, तहसीलदार संदीप खोमणे, अभियंते संजीवकुमार चोपडे, मंगेश लोणकर, जगताप, एपीओ गणेश जोगदंड, तसेच रुईचे सरपंच कालिदास नवले व सिसरदेवीचे सरपंच रवींद्र गाडे यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दौऱ्यानंतर गढी येथील जवाहर नवोदय विद्यालय व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट देत, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भौतिक सोयी-सुविधांची पाहणी केली. यानंतर गेवराई तहसील कार्यालयात सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रशासनातील अडचणी, नागरिकांच्या तक्रारी आणि उपाययोजना यावर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, थेट संवादातून प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत होत आहे.

Last Updated: July 4, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.