Breaking

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून दुचाकी लंपास

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून दुचाकी लंपास

WhatsApp Group

Join Now

बीड – शहरातील नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून मंगळवार (दि.१७) रोजी १२.३० च्या सुमारास भरदुपारी अज्ञात चोरटयांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत दादाराव ढेकळे (वय ३५) रा.तीप्पटवाडी ता.जी.बीड यांची हिरो होंडा स्पेलडर प्लस कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच २३ बीए १०६२ हि शहरातील नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावली असता मंगळवार (दि.१७) रोजी १२.३० च्या सुमारास भरदुपारी अज्ञात चोरटयांनी दुचाकी लंपास केल्याची घटना घडली असून ३०००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी वसंत ढेकळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (दि.१९) गुरुवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Last Updated: June 20, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.