Breaking

अपहरण करून बेदम मारहाण; जखमी तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

जखमी तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

अंबाजोगाई : देवळा येथील अविनाश गोरोबा सगट (वय 27, रा. धानोरा ता. अंबाजोगाई) या युवकाचा अपहरण करून मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अविनाश सगट याने दोन दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांच्या घरात वाईट उद्देशाने प्रवेश केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी भावकीतील काही नातेवाईकांनी त्याचे अपहरण केले. त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून गावापासून दूर धानोरा खुर्द येथील कॅनॉल परिसरात नेले आणि काठ्या, दगडाने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पुन्हा घरी आणून सोडण्यात आले.

बुधवारी सायंकाळी त्याची प्रकृती अधिक खालावल्याने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी अद्याप अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.