Breaking
Updated: जुलै 31, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : टेकजायंट Apple आपल्या बहुप्रतिक्षित iPhone 17 सिरीजचा लॉन्च लवकरच करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सप्टेंबरमध्ये ही नवी सिरीज बाजारात येण्याची शक्यता आहे. यंदाच्या लाइनअपमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air हे चार मॉडेल्स सादर होणार आहेत. मात्र यावेळी ‘Pro’ मॉडेल्सच्या किमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ज्येफ्रीज या नामांकित रिसर्च फर्मने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्धामुळे iPhone 17 Pro सिरीजच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च Apple थेट ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे.
| मॉडेल | किंमत (USD) | भारतीय किंमत ( अंदाजे ₹ ) |
|---|---|---|
| iPhone 17 | $799 | ₹70,000 |
| iPhone 17 Air | $949 | ₹83,000 |
| iPhone 17 Pro | $1,049 | ₹91,000 |
| iPhone 17 Pro Max | $1,249 | ₹1,09,000 |
Apple भारतात आपले iPhone Pro मॉडेल्स महागड्या किमतीत लॉन्च करत आले आहे. मागील वर्षी iPhone 16 Pro ची प्रारंभिक किंमत ₹1,19,900 होती, तर iPhone 15 Pro ₹1,34,900 ला मिळत होता. मात्र यंदा iPhone 17 चे बेस मॉडेल कंपनी ₹79,999 मध्ये सादर करू शकते, अशी माहिती 91mobiles या पोर्टलने दिली आहे. या किमतीत लॉन्च केल्यास मागील वर्षीप्रमाणे विक्री वाढण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक ऑफर्स आणि ईएमआय स्कीम्सही सुरूच राहतील.
iPhone 17 Pro सिरीजमध्ये नव्या डिझाइनसह रिडिझाइन केलेला कॅमेरा मॉड्युल मिळू शकतो. त्यात Apple चा नवा A19 Pro चिपसेट देण्यात येणार आहे. तसेच 48 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा हे मॉडेल्समध्ये दिला जाण्याची शक्यता आहे.
iPhone 17 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला OLED डिस्प्ले मिळू शकतो. सर्व मॉडेल्स iOS 26 ऑपरेटिंग सिस्टीमसह येतील. यंदा काही नव्या रंगांमध्येही iPhone उपलब्ध असतील, अशी माहिती मिळत आहे.
iPhone 17 सिरीजमुळे पुन्हा एकदा भारतीय बाजारात स्मार्टफोन स्पर्धा चांगलीच रंगणार आहे.