Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाईचा १ फेब्रुवारी रविवार रोजी पदग्रहण सोहळा

Updated: जानेवारी 31, 2026

By Vivek Sindhu

अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, सचिव डॉ.उध्दव शिंदे यांची माहिती

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे, सचिव डॉ.उध्दव शिंदे यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाईचा आज रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांनी दिली आहे.

शहरातील हॉटेल पियुष ईन, मुख्य रस्ता, अंबाजोगाई या ठिकाणी आज रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी, सायंकाळी ६.३० वाजता इंडियन मेडिकल असोसिएशन‌ योगेश्वरी शाखा, अंबाजोगाई यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.संतोष कुलकर्णी (अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.) तर सन्माननीय अतिथी म्हणून नंदकिशोर मुंदडा (नगराध्यक्ष, नगरपरिषद, अंबाजोगाई.), डॉ.शंकरराव धापटे (अधिष्ठाता, स्वा.रा.ती. महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई.), डॉ.रमेश भराटे (अध्यक्ष, स्थायी समिती, आयएमए, मुख्यालय.) आणि डॉ.राजेश इंगोले (अध्यक्ष, सांस्कृतिक समिती, आयएमए, महाराष्ट्र राज्य.) तर विशेष निमंत्रित म्हणून डॉ.अनंत मुळे (अध्यक्ष, आयएमए, बीड.), डॉ.सत्यप्रेम वारे (अध्यक्ष, आयएमए, कळंब.), डॉ.अभय कदम (अध्यक्ष, आयएमए, लातूर.), डॉ.श्यामसुंदर काकानी (अध्यक्ष, आयएमए, माजलगाव.), डॉ.अजित केंद्रे (अध्यक्ष, आयएमए, परळी.), डॉ.दिनकर राऊत (अध्यक्ष, आयएमए, केज.) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.राहुल धाकडे (अध्यक्ष), डॉ.उद्धव शिंदे (सचिव), डॉ.विजय लाड (उपाध्यक्ष), डॉ.बलिराम मुंडे (खजिनदार), डॉ.अतुल शिंदे (सहसचिव), डॉ.निलेश तोष्णीवाल (सहसचिव), डॉ.नितीन पोतदार (सांस्कृतिक सचिव), डॉ.अनिल मस्के (सांस्कृतिक सचिव), डॉ.सुनील जाधव (सांस्कृतिक सचिव), डॉ.शिवराज पेस्टे (क्रीडा सचिव), डॉ.संदीप जोगदंड (क्रीडा सचिव), डॉ.विनोद जोशी (राज्य समन्वयक), डॉ.नवनाथ घुगे (माजी अध्यक्ष-आयपीपी) तसेच महिला शाखेच्या डॉ.मनीषा पवार (अध्यक्षा), डॉ.जिगिशा मारवाळे (सचिव) आणि डॉ.अरूणा केंद्रे (माजी अध्यक्षा महिला शाखा) यांनी पुढाकार घेतला आहे.


Categories

Recent Posts