Breaking

भयंकर! आजारी पत्नीवर पतीने दवाखान्यात तलवारीने केला प्राणघातक हल्ला

Updated: सप्टेंबर 16, 2025

By Vivek Sindhu

images 2025 09 16T222828.246

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव : दारूच्या नशेत चारित्र्यावरून संशय घेत वारंवार पत्नीला मारहाण केली. गंभीर मारहाणीमुळे पत्नीला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, संशयाचे भूत चढलेल्या पतीने अखेर दवाखान्याच पत्नीवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नी जखमी झाली असून पतीविरुद्ध माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अर्चना उमेश मुंडे (वय 24, रा. फुलेनगर, माजलगाव) असे त्या जखमी पत्नीचे नाव आहे. अर्चना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती उमेश माणिक मुंडे (रा. फुलेनगर, माजलगाव) हे ट्रक चालक असून त्यांना दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन ते घरखर्च देत नाहीत आणि पत्नी व मुलांवर नेहमी मारहाण करतात. 13 सप्टेंबर रोजी मुलांनी केक मागितल्याने पतीने त्यांना चापटी मारली. त्यामुळे फिर्यादीचे वडील लक्ष्मण आंधळे यांनी मुलांना गावाकडे नेले.

14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून उमेश मुंडे यांनी पत्नीवर कमरेच्या बेल्टने मारहाण केली व रात्रभर झोपु दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बेशुद्ध पडल्यावर दिर महेश मुंडे यांनी तिला सिद्धेश्वर हॉस्पिटल, माजलगाव येथे दाखल केले.

15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आरोपी पती तलवार घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसला. पत्नीवर चरित्रावर संशय घेत तिच्या मानेवर तलवार उगारली. दिर महेश मुंडे यांनी तलवार हाताने अडवली पण तलवारीचा घाव त्यांच्या हाताला बसला. पुन्हा पत्नीवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करताना ती कमरेला झोडपली. या गोंधळात आरोपीने हॉस्पिटलमधील काचांच्या खिडक्या व इतर साहित्याची तोडफोड केली.

या घटनेत पत्नी अर्चना मुंडे जखमी झाली असून आरोपी पती उमेश माणिक मुंडे याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, मारहाण व तोडफोडीचा गुन्हा माजलगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.


Categories

Recent Posts