Breaking

मटण न दिल्याच्या रागातून हॉटेल चालकाला बेदम मारहाण

Updated: सप्टेंबर 16, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत तरुणावर रॉड व काठीने हल्ला, नाक फॅक्चर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरुर कासार : मटण संपल्याचे सांगितल्याच्या रागातून दोन युवकांनी हॉटेल चालकाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना 14 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता खोकरमोहा येथील जय महाराष्ट्र हॉटेलजवळ घडली.


वाल्मीक काशीनाथ मिसाळ (वय 45, रा. खोकरमोहा, ता. शिरुर का.) यांचे बीड-शिरुर रोडवर हॉटेल आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दि. 14 सप्टेंबर रोजी रात्री ते पत्नी उल्का व मुलगा सार्थक यांच्यासह घरी जेवत होते. यावेळी भावकीतील बाळु नामदेव मिसाळ (वय 30) हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने मटण मागितले. मात्र हॉटेलमध्ये मटण व चिकन संपल्याचे सांगितल्यावर बाळु याने घराजवळील शेळीच्या शेडमधून बोकड धरून “हे कापा” असे सांगत शिवीगाळ केली.


या वादातून बाळु मिसाळ आणि त्याचा मित्र बालाजी गोविंद बांगर (रा. खोकरमोहा) यांनी लोखंडी पाईपाने वाल्मीक यांच्या डोक्यात, हातावर व पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत केली. भांडण सोडविण्यास आलेल्या पत्नीला शिवीगाळ केली तसेच दोघांनी फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली.


गोंधळ ऐकून शेजारी अंकुश भगवान बांगर, ज्ञानदेव श्रीपती मिसाळ आणि वासुदेव महादेव मिसाळ घटनास्थळी आले असता आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले.
या प्रकरणी शिरुर कासार पोलिस ठाण्यात बाळु नामदेव मिसाळ व बालाजी गोविंद बांगर यांच्यावर मारहाण, धमकी व शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.


Categories

Recent Posts