Breaking
Updated: ऑक्टोबर 8, 2025
होळ येथे घरफोडी; ६७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज : होळ गावात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी होळ येथील सुनिता नामदेव राख (वय ४८, रा. होळ, ता. केज, जि. बीड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
ही घटना ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी यांच्या अनुपस्थितीत चोरट्याने घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये एक १० ग्रॅमचे कानातील डांबर (किंमत ४५,००० रुपये) आणि एक ५ ग्रॅमचे कानातील वेल (किंमत २२,५०० रुपये) असा एकूण ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल आहे.
घटनेचा मानसिक धक्का बसल्याने फिर्यादीने उशिराने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६०/२०२५ कलम ३३१(३), ३०५ भा.दं.सं. अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी बिक्कड करत आहेत.