Breaking

गुरांची गाडी आडविल्यावरून मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

Updated: सप्टेंबर 27, 2025

By Vivek Sindhu

एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – गुरे घेऊन जाणारे वाहन अडवून विचारणा केल्यावरून चौघांनी चापटाने व लाथाबुक्याने मारहाण केल्याचा प्रकार साळेगाव (ता. केज) येथील गुरांच्या आठवडी बाजारात घडला. याप्रकरणी चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सासुरा (ता. केज) येथील गहिनीनाथ मनोहर पाळवदे व त्यांचे सहकारी हे अखिल भारतीय गोसेवा संघाचे काम करीत आहेत. अवैधपणे कत्तलीसाठी होणाऱ्या जनावराच्या वाहतुकीवर प्रतिबंध व्हावा, म्हणुन ते बीड जिल्ह्यात काम करतात. २५ सप्टेंबर रोजी ९.३० वाजता गहिनीनाथ पाळवदे, केशव रत्नपारखे (रा. बीड), निखील कदम (रा. बीड), दादा पंडीत (रा. वाशी) या चौघांनी सुर्डी फाटा येथे तीन जर्शी गायी व एक देशी बैल घेऊन जाणारे पीकअप (एम. एच. ०३ सीव्ही ७३०२) अडवून विचारणा केली. चालकाने त्यांना धाराशिव येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. तेवढ्यात अचानक साळेगाव बाजारातून आलेल्या व्यापाऱ्यांनी आमची गाडी अडवण्याचा, तुम्हाला कोणी अधिकार दिला म्हणत गाडी आडवल्याचा राग मनात धरुन चौघांनी केशव रत्नपारखे याला चापटाने मारहाण केली. त्यांनी दुचाकीवर बळजबरीने गहिनीनाथ व केशव यांना बसवून साळेगावच्या बाजारात आणले. तेथे तुम्ही नेहमीच गाडी अडविता म्हणून मारायला सुरुवात केली. त्यामुळे गहिनीनाथ पाळवदे हे पळून गेले. तर केशव रत्नपारखी यांना लाथाबुक्याने मारहाण केली. त्यांनी पोलिसांना फोन केल्याने जमादार बाबासाहेब बांगर हे बाजारात आल्याचे पाहून मारहाण करणारे पळून गेले. अशी तक्रार गहिनीनाथ पाळवदे यांनी दिल्यावरून आयाज जफार कुरेशी (रा. केज), असद कुरेशी (रा. धाराशिव) व इतर दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार भारत बरडे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts