Breaking

गुणवत्तेचा आलेख उंचावण्यात प्रा. अजय पाठक यांचे मोठे योगदान – चंद्रशेखर बर्दापूरकर

Updated: डिसेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

गुणवत्तेचा आलेख उंचावण्यात प्रा. अजय पाठक यांचे मोठे योगदान - चंद्रशेखर बर्दापूरकर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई -: शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा आलेख उंचावण्यात उपप्राचार्य अजय पाठक यांचे मोठे योगदान आहे.असे प्रतिपादन योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी केले.
येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अजय पाठक हे शनिवारी ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर,संस्थेचे सहसचिव ओमप्रकाश शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मारुती कानेटकर, उपप्राचार्य डॉ .आर.व्ही.कुलकर्णी, प्रा. नीलिमा कुमठेकर,सत्कारमूर्ती प्रा .अजय पाठक, सौ .रोहिणी पाठक,डॉ. मैत्रेयी पाठक,अमेय पाठक ,धनराज सोळंकी, कमलेश कुमार ठाकूर,यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना चंद्रशेखर बर्दापूरकर म्हणाले की उपप्राचार्य अजय पाठक यांचे व्यक्तिमत्व प्रभाव टाकून जाते.विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यात त्यांचे मोठे योगदान आहे. गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी त्यांनी काम केले. ते संस्थेशी कायम जोडलेले राहतील.त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळाली. अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी बोलताना ओमप्रकाश शेटे म्हणाले परिस्थिती कशी हाताळायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजय पाठक होय. निष्ठा,समर्पण भावनेतून त्यांनी सेवा केली. एक
विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
या वेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना अजय पाठक यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवेतील चढ उतार सांगितले. आपली जडण घडण संस्थेच्या माध्यमातून झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी , ” स्वप्ने उराशी बाळगत विदर्भातून आलेल्या एक तरुणास स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संस्थेमध्ये प्राध्यापकाची नोकरी करताना संपूर्ण आयुष्याची आणि कुटुंबाची जडण घडणं झाल्याचे सार्थक झाले!” यावेळी रोहिणी पाठक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अजय पाठक,रोहिणी पाठक यांचा शाल श्रीफळ व भेट देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निलिमा कुमठेकर यांनी केले. संचलन वृंदा कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. धनराज डोंगरदिवे यांनी मानले.


Related Posts :

Categories

Recent Posts