Breaking
Updated: ऑगस्ट 20, 2025
तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला तलवाडा पोलिसांची अटक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधारूर : तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील शेतकऱ्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी चार काळ्या रंगाच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक गणपत धुमाळ (रा. तेलगाव कारखाना, ता. धारूर) यांच्या राहत्या घरालगत असलेल्या जाळीच्या पत्र्याच्या शेडमधून १८ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजल्यापासून १९ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी चार काळ्या रंगाच्या शेळ्या चोरून नेल्या. प्रत्येकी अंदाजे ५ हजार रुपये किंमतीच्या या शेळ्यांची एकूण किंमत २० हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बहिराळ पुढील तपास करत आहेत.