Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : परळीच्या रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कॉ.बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे यांच्यासह शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात मागणी करताना नमूद केले आहे कि, रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी परळी रेल्वे स्टेशन येथे ही अमानुष घटना दलित समाजातील रोजगाराच्या शोधात असलेल्या भटकंती मजुराच्या निष्पाप लेकरा सोबत घडली, देशात सध्या दलित व कमजोर वर्गातील स्त्रियांवर अन्याय व अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे, पोलीस व सरकारी यंत्रणा या केवळ पाट्या टाकायचे काम करतात. त्यामुळे समाजात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दलित व स्त्री अत्याचार हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून तो प्रश्न सामाजिक व राजकीय आहे, समतामूलक प्रयत्नांची व आरोपींना कठोर शासन होण्याची गरज आहे, या प्रकरणी पंढरपूरच्या या वाघमारे कुटुंबाला व त्याच्या लहान मुलीला न्याय मिळण्यासाठी कोणताही कसूर होऊ नये. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर निवेदक कॉ.बब्रुवाहन पोटभरे, विनोद शिंदे, शेख बाबा, पप्पु आदमाने, शेख शफिक, अमोल गणपत माने, प्रेम माने, विशाल पोटभरे, सचिन गालफाडे, हनिफ पठाण, लोनू गोडबोले, रवि आवाडे, अशोक पालके आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नराधमाला तात्काळ फाशी द्यावी : – कॉ.बब्रुवाहन पोटभरे (ज्येष्ठ नेते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)
परळी वैजनाथ रेल्वे स्थानक परिसरात बाहेरगावाहून आलेल्या एका वाघमारे नामक दांम्पत्याच्या पाच वर्षांच्या निष्पाप बालिकेवर शनिवारी एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले हे जरी कौतुकास्पद असले तरी हे प्रकरण लवकरात लवकर चार्जफेम करून फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे. मानवजातीला काळीमा फासणाऱ्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी.