Breaking
Updated: नोव्हेंबर 19, 2025
घर तिथे पक्का रस्ता : अंबाजोगाई शहर विकासाचा ‘मुंदडा पॅटर्न’
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : कधीकाळी कल्पनेपलीकडील वाटणारे तब्बल ३५० कोटींच्या रस्तेविकासाचे स्वप्न अंबाजोगाईने मागील काही वर्षांत प्रत्यक्षात अनुभवले. शहराच्या प्रत्येक भागात पक्का रस्ता पोहोचवण्याचा ध्यास घेऊन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आ. नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी तयार केलेला रस्ताविकास आराखडा आज वास्तवात उतरला आहे. मुंदडा कुटुंबाची सातत्यपूर्ण धडपड, शासनाकडे केलेला पाठपुरावा आणि शहराच्या गरजांवरील अचूक लक्ष यामुळे अंबाजोगाईत विकासाचा वेग अभूतपूर्व पातळीवर पोहोचला.
मागील तीन वर्षात अंबाजोगाई शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला. यामुळे शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटिकरण झाले आहे. अनेक दशकांपासून खराब रस्त्यांच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या नागरिकांसाठी शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली-बोळांतील रस्ते देखील पक्के व टिकाऊ झाल्याने नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुखकर आणि सोयीस्कर झाला आहे. शहरातील जवळपास प्रत्येक घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता गेला आहे, जिथे कुठे राहिला असेल तिथेही लवकरच होणार आहे. सिमेंट काँक्रीटच्या मजबूत रस्त्यांमुळे पावसाळ्यातील चिखल, खड्डे, पाणी साचणे आणि वारंवार दुरुस्ती यापासून आता अंबाजोगाई शहर मुक्त झाले आहे.
अंबाजोगाई हे शांतता, शिक्षण आणि रहायला योग्य वातावरण यामुळे आसपासच्या गावांतील लोकांचे आकर्षणस्थान बनले आहे. शहर जलदगतीने वाढत असून नव्या वसाहतींचा विस्तार सतत सुरू आहे. वाढत्या शहरीकरणाचा भार शहराच्या रस्त्यांवर पडू लागल्याने मजबुत पायाभूत सुविधा उभारणे अत्यावश्यक झाले होते. या गरजेची अचूक जाणीव ठेवून मुंदडा कुटुंबाने शहराच्या पायाभूत विकासाला ज्या पद्धतीने प्राधान्य दिले, तोच ‘मुंदडा पॅटर्न’ आज विकासाचा नवा मापदंड ठरत आहे. या ‘मुंदडा पॅटर्न’मुळे अंबाजोगाई रस्तेविकासाचा नकाशा पूर्णपणे पालटला आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेवर कायमचा उपाय म्हणून सिमेंट काँक्रीटचे टिकाऊ रस्ते उभारण्याचा निर्णय हा शहराच्या दीर्घकालीन हिताचा मानला जात आहे.
अंबाजोगाईच्या विकासपथावरील ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी आणि सुरू असलेली कामे अधिक वेगाने, अधिक नेमकेपणाने पूर्ण करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. शहरात घडलेल्या रस्तेविकासाच्या या महाअभियानाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर मुंदडा यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरले आहे. शहरातील पायाभूत विकासाची सातत्यपूर्ण गती कायम राखायची असेल, नव्या योजना आणि मोठ्या प्रकल्पांना गती द्यायची असेल, तर आगामी काळात नगराध्यक्षपदासाठी नंदकिशोर मुंदडा यांची निवड अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अंबाजोगाईच्या सर्वांगीण विकासाला वेग, दिशा आणि स्थैर्य देणारा ‘मुंदडा पॅटर्न’ पुढील पाच वर्षांत आणखी व्यापक रूप धारण करू शकतो. शहरातील पक्का रस्ता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न आता पूर्णत्वाला पोहचत असतानाच भविष्यातील विकास अधिक वेगवान करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांची नगराध्यक्षपदी निवड हीच शहराच्या प्रगतीची हमी ठरू शकते, असा ठाम विश्वास शहरातील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.