Breaking
Updated: सप्टेंबर 20, 2025
गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – एका अल्पवयीन मुलीसह तिच्या सोबत असलेल्या महिलेस चहापाणी नाष्टा करू अशी थाप मारून गटशिक्षणाधिकाऱ्याने त्यांना कारमध्ये बसवून नेत निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून शिक्षण विस्तार अधिकारी डी. एम. चाटे, एस. एस. केंद्रे हे त्रास देण्याच्या उद्देशाने कटकारस्थान करीत असून धारूरचे कार्यकर्ते सादिक इनामदार हे पदभार काढून घेण्यासाठी तक्रारी करीत आहेत. तर १८ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजता विश्रामगृहाच्या बाजूस भेटलेली महिला व दोन मुलींनी काही खास बोलायचे आहे असे सांगून कारमध्ये बसून रुपेश कोल्हे शेतापर्यंत नेले. त्याठिकाणी पाठीमागून जीपमध्ये तोंड बांधून आलेल्या चार ते पाच लोकांनी दमदाटी करीत मोबाईल, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एटीएम कार्ड काढून घेतले. बलात्कार व विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. पत्नीच्या मोबाईलवर दीपक थोरातचा भाऊ बोलतोय असे सांगून हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. वरील लोकांपासून जीवितास धोका असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, असा लेखी अर्ज लक्ष्मण बेडसकर याने त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर केज पोलीस ठाण्यात दिला होता.