Breaking
Updated: डिसेंबर 22, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेल्या अंबाजोगाई येथील गिरी प्रो-ऍक्टिव्ह अबॅकस केंद्राच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे. २० डिसेंबर रोजी बीड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय विभागीय अबॅकस स्पर्धेत या केंद्राच्या १२ विद्यार्थ्यांची निवड आता थेट पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. या यशामुळे अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या स्पर्धेत राज्यभरातील विविध भागांतून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. गणितातील अचूकता आणि वेगाची ही एक कठीण परीक्षा होती. यामध्ये विद्यार्थ्यांना अवघ्या सहा मिनिटांत १०० गणिते सोडवण्याचे आव्हान देण्यात आले होते. या आव्हानात्मक कसोटीवर अंबाजोगाईच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी मात केली. केंद्राच्या एकूण ३२ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
राष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी मिळालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रीनिवास तांदळे, आरव जाधव, विराज जाधव, अवंतिका जाधव, तेजस्विनी बच्चेवाड, गणेश भताने, Naman पितळे, आराध्या ढाकणे, आदित्य शेप, नकुल गरड आणि आयुष कदम या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित २० विद्यार्थ्यांनीही सुवर्णपदक आणि प्रमाणपत्रे पटकावत केंद्राचा नावलौकिक वाढवला.
विशेष म्हणजे अंबाजोगाई शहरासह घाटनांदूर, पुस चनई, कानडी-बदन, लोखंडी सावरगाव, माकेगाव आणि मोरेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले. केंद्राच्या संचालिका प्रियांका गिरी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुणे येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही हे विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पत्ता – गिरी प्रोऍक्टिव्ह अबॅकस व कोचिंग क्लासेस,बाजीप्रभू देशपांडे चौक, केशव नगर, कृष्ण मंदिराच्या शेजारी अंबेजोगाई.
शाखा क्रमांक २) हर्षद अकॅडमी ,संभाजी राजे चौक, प्रशांत नगर ,अंबेजोगाई.
शाखा क्रमांक ३) गोविंद जाधव सर यांचा हॉल ,घाटनांदुर.
आजच आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चितीसाठी आमच्याशी संपर्क साधावा.
ऑनलाइन/ऑफलाईन क्लासेस ची सुविधा उपलब्ध आहे.
संपर्क – ९७६४०५५५०१ / ९८९००९४०४१