Breaking

थार गाडी गहाण ठेवण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा

Updated: नोव्हेंबर 2, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 11 02 at 21.30.43 3e806491

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : परळी येथील एका व्यापाऱ्याची थार गाडी गहाण ठेवण्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी राहुल रामहरी कांदे (वय 38, रा. जिरेवाडी, ता. परळी) यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी राहुल कांदे यांचा मित्र संजय गुलाब पवार (रा. शिवाजीनगर, परळी) याने 30 जुलै रोजी फोन करून “माझ्या मित्राकडे थार गाडी आहे, त्याला पैशांची गरज आहे, गाडी गहाण ठेवतो” असे सांगितले. त्यानंतर त्याने गाडीचे फोटो आणि आरसीबुक पाठवले. सदर गाडी क्रमांक MH12WK2276 असून ती प्रताप शेषेराव राठोड (रा. पुणे) यांच्या नावावर असल्याचे समोर आले. पवारच्या सांगण्यावरून फिर्यादी पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन मित्रांसह केज येथे गेले.

तेथे प्रताप राठोड, गणेश नडगीरे (रा. धारुर), शहबाज खान (रा. परळी) हे उपस्थित होते. केज येथील एका संगणक केंद्रात करारनामा तयार करून रात्री 10 वाजता नोटरी करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीने प्रताप राठोड व गणेश नडगीरे यांना रोख पाच लाख रुपये दिले आणि थार गाडीची चावी आपल्या ताब्यात घेतली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी घरासमोरून गायब झाल्याचे लक्षात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात व्यक्ती स्वीफ्ट कारमधून येऊन थार गाडी घेऊन गेल्याचे दिसले.

त्यामुळे राहुल कांदे यांनी मित्र संजय पवार याच्याशी संपर्क साधला असता त्याने याबाबत काहीही माहित नसल्याचे सांगितले. काही दिवसांनी पवार, शहबाज खान, रवि मुंडे (रा. अंबाजोगाई) यांनी “पैसे परत मिळतील” असे सांगत वेळ मारून नेली. मात्र अखेरीस पैसे न मिळाल्याने कांदे यांनी या सर्वांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात संजय गुलाब पवार (रा. परळी), शहबाज खान (रा. परळी), रवि मुंडे (रा. अंबाजोगाई), गणेश नडगीरे (रा. धारुर), प्रताप शेषेराव राठोड (रा. पुणे) या सहा जणांविरुद्ध संगनमत करून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास केज पोलीस करीत आहेत. 


Categories

Recent Posts