Breaking

फार्मर आयडी असूनही डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विम्याची संधी द्यावी

Updated: ऑगस्ट 20, 2025

By Vivek Sindhu

InShot 20250820 220829866

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आ. नमिता मुंदडा यांची कृषिमंत्र्याकडे मागणी

अंबाजोगाई : राज्यभरात शेतकऱ्यांना मदतीच्या विविध शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे पिक कर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पिक विमा तसेच कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढूनही त्यांच्या माहितीचा डाटा प्रणालीवर उपलब्ध होत नसल्यामुळे हे शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

या गंभीर प्रश्नाबाबत आमदार नमिता मुंदडा यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे. मात्र डाटा उपलब्ध नसल्याने पिक विमा भरणे शक्य होत नाही. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मोठा अन्यायकारक ठरू शकते. त्यामुळे विशेष बाब म्हणून अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची परवानगी देण्यात यावी.

मुंदडा यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न पावसावर आणि नैसर्गिक संकटांवर अवलंबून आहे. अशा वेळी पिक विमा ही शेतकऱ्यांसाठी मोठी सुरक्षा ठरते. मात्र केवळ तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. शासनाने तातडीने आदेश काढून डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांनाही विमा भरण्याची मुभा द्यावी.

राज्यातील हजारो शेतकरी या समस्येला सामोरे जात असल्याने कृषी खात्याने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय तातडीने होणे आवश्यक असल्याचे मत आमदार मुंदडा यांनी व्यक्त केले आहे.


Categories

Recent Posts