Breaking

अंभोरा परिसरात शेतकऱ्यांच्या मोटार आणि केबलची चोरी

Updated: मार्च 2, 2026

By Vivek Sindhu

अंभोरा परिसरात शेतकऱ्यांच्या मोटार आणि केबलची चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरनरवाडी येथील पाराजी दादाबा सुरनर यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ९०० फूट लांबीची केबल वायर चोरून नेली, ज्याची किंमत १५ हजार रुपये आहे. दुसऱ्या घटनेत घाटापिंपरी येथील बाबासाहेब भिकाजी तळेकर यांच्या विहिरीवरील ६ हजार रुपये किमतीची ३ एचपी पॉवरची ‘अजिंठा’ कंपनीची पाण्याची मोटार चोरीला गेली आहे. २८ फेब्रुवारीच्या रात्री या दोन्ही चोऱ्या झाल्या असून अज्ञात आरोपींविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेती साहित्याच्या वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरात शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून पोलीस हवालदार तांदळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts