Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

तक्रार का दिली म्हणून कुटुंबावर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला

Updated: फेब्रुवारी 16, 2026

By Vivek Sindhu

तक्रार का दिली म्हणून कुटुंबावर दुसऱ्यांदा जीवघेणा हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – शहरातील सहयोग नगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वादातून पिता-पुत्रावर भररस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला. पाच दिवसांपूर्वीही घरात घुसून मारहाण झाली होती. शहरातील सहयोग नगर परिसर आज सकाळी पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत गेला. सदाशिव कोकाट आणि त्यांचा मुलगा हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानाकडे जात असताना, त्यांच्या एमआयडीसी भागातील घरासमोर दबा धरून बसलेल्या टोळक्याने भररस्त्यात त्यांच्यावर काठ्या लाठ्यांनी व शस्त्रांनी हल्ला चढवला. या बेदम मारहाणीत पिता-पुत्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी अचानक रस्ता अडवून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. काही क्षणातच परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी धाव घेईपर्यंत हल्लेखोरांनी दोघांना गंभीर जखमी करून पसार झाल्याचे सांगितले जाते. या घटनेपूर्वी अवघ्या पाच दिवसांपूर्वी याच टोळक्याने कोकाट कुटुंबाच्या घरात घुसून महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या टोळक्यात काही महिलांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आम्ही मारहाणीची तक्रार का दिली? या कारणावरून सूडबुद्धीने आजचा हल्ला झाल्याचा आरोप कोकाट कुटुंबीयांनी केला आहे.


Categories

Recent Posts