Breaking

आ. नमिता मुंदडा यांचे राष्ट्रकुल संसदीय परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी प्रतिनिधित्व; लोकशाही सक्षमीकरणावर दिला भर

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

668604551 1490524115763266 7797436087073968859 n

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: गोव्याची राजधानी पणजी येथे ८ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय संघ (CPA) भारत क्षेत्र – ७ (पश्चिम विभाग) च्या वार्षिक परिषदेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्राच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवत आपले प्रभावी प्रतिनिधित्व सिद्ध केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उच्चस्तरीय परिषदेत ‘विकसित भारत – २०४७’ या ध्येयाकडे वाटचाल करताना युवा लोकप्रतिनिधींची भूमिका आणि प्रादेशिक विकासाचे विविध पैलू यावर सखोल विचारमंथन करण्यात आले. या परिषदेसाठी देशभरातील ज्या मोजक्या आणि निवडक आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते, त्यामध्ये आमदार नमिता मुंदडा यांचा समावेश होता, ही बाब त्यांच्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उमटवणारी ठरली आहे.

परिषेदेच्या विविध सत्रांमध्ये आमदार मुंदडा यांनी व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण आणि तटीय संपर्क यंत्रणा यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांतील आव्हाने आणि संधींवर आपले विचार मांडले. आगामी काळातील धोरणात्मक दिशा निश्चित करताना युवा लोकप्रतिनिधींनी तांत्रिक आणि सामाजिक बदलांचा स्वीकार करून लोकाभिमुख कार्य करणे कसे गरजेचे आहे, यावर त्यांनी यावेळी विशेष प्रकाश टाकला. या जागतिक दर्जाच्या व्यासपीठावरून मिळालेल्या अनुभवाचा आणि धोरणात्मक मार्गदर्शनाचा उपयोग केज मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अधिक सक्षम जनप्रतिनिधित्वासाठी करणार असल्याचा दृढ विश्वास आमदार मुंदडा यांनी यावेळी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण परिषदेला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण, गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर फरीद यांसारख्या दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. तसेच आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष चिंताकायला अय्यन्ना पात्रुडू, गोव्याचे उपसभापती जोशुआ डी’सूझा यांच्यासह महाराष्ट्रातून विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आमदार मुंदडा यांनी चर्चेत सहभाग घेतला. या परिषदेमुळे विविध राज्यांतील संसदीय कार्यप्रणाली समजून घेण्यास मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.


Categories

Recent Posts