Breaking
Updated: नोव्हेंबर 1, 2025
'एकता दौड'मध्ये धावले अधिकारी, कर्मचारी, व सामाजिक कार्यकर्ते...
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी अंबाजोगाई पोलिस दलाच्या वतीने शुक्रवारी सकाळी रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते. यातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देत पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, युवती यांचा मोठा सहभाग होता.
या एकता दौड चे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या सह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या दौड मध्ये
एक भारत, श्रेष्ठ भारतचा जयघोष…
अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके म्हणाल्या की , सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय ऐक्याचा पाया घातला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाने देशाच्या एकतेसाठी योगदान द्यावे, हीच खरी त्यांना आदरांजली आहे.