Breaking

एकास बेदम मारहाण ; चौघांवर गुन्हा

Updated: ऑक्टोबर 28, 2025

By Vivek Sindhu

बोरगाव चकला येथे घरफोडी; ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज -वाघेबाभुळगाव (ता. केज) येथील संतोष आश्रुबा हावळे (वय ३३) यांना २५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता त्यांचे शेजारी विलास हनुमंत हावळे, राजेभाऊ गोवर्धन हावळे, संजिवन गोवर्धन हावळे, राहुल रामराव हावळे या चौघांनी तुझ्या शेतामध्ये मळणी यंत्र का लावु नका असे म्हणालास असे म्हणत शिवीगाळ केली. तर विलास व राजेभाऊ या दोघांनी काठीने मारून जखमी केले. संजिवन व राहुल या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. संतोष हावळे यांच्या तक्रारीवरून विलास हावळे, राजेभाऊ हावळे, संजिवन हावळे, राहुल हावळे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार राजू वाघमारे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts