Breaking
Updated: फेब्रुवारी 27, 2026
मंदिराच्या शिखराच्या कामासाठी दिली देणगी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. योगेश्वरी देवीच्या मुंबई येथील भक्ताने मंदिराच्या शिखर बांधकामासाठी थोडी थोडकी नव्हे तर चक्क एक कोटी रुपयांची देणगी दिली. तिही नाव न सांगण्याच्या अटीवर.
अंबाजोगाई येथील श्री. योगेश्वरी देवीच्या मंदिराचे असलेले शिखर हे शंभर वर्षांपूर्वीचे आहे. त्याचे बांधकाम चुन्यात असल्याने ते आता तकलादू झाले आहे. या शिखराच्या कामाचा जीर्णोध्दार करणार असल्याचे योगेश्वरी देवल कमिटीने जाहीर केले. याची माहिती मुंबई येथील भक्ताला माहीत झाली. या शिखराच्या कामासाठी किमान ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ आपला दूत पाठवून श्री.योगेश्वरी देवल कमिटीच्या विश्वस्तांकडे एक कोटी रुपयांचा धनादेश पाठवून दिला. त्या धनादेशाची रक्कम बँकेत जमाही झाली. आता या रकमेतून मंदिराच्या शिखराच्या जीर्णोधाराचे काम या आठवड्यात सुरू होत आहे. या कामासाठी तामिळनाडू येथील स्पेशल कारागीर नक्षीकाम करत या शिखराचे बांधकाम पूर्ण करणार आहेत. मात्र ते एक कोटी रुपयांची निनावी देणगी देणारा देणगीदार कोण? याचीच उत्सुकता श्री. योगेश्वरी देवीच्या भक्तांमध्ये आहे.