Breaking
Updated: ऑक्टोबर 28, 2025
अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावर कदमवाडी फाट्याजवळ रविवारी (दि. २६) रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान घडली.
संतोष ठोंबरे आणि सुरज काकडे हे दोघे रविवारी रात्री ८.१५ वाजता दुचाकीवरून (एम. एच. ४४ वाय २५७७) साळेगाव येथून केजकडे जात असताना केज – कळंब रस्त्यावर तेलंग व दत्तात्रय आरडकर यांच्या शेताजवळ ऊसतोड मजुरांना घेऊन कळंबच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून पुढे चालत असलेल्या शिवानंद स्वामी यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात संतोष ठोंबरे व सुरज काकडे हे दोघे जखमी झाले असून सुरज काकडे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. तर शिवानंद स्वामी हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.