Breaking
Updated: ऑक्टोबर 27, 2025
डॉ.संपदा मुंडे न्यायासाठी माकप करणार जिल्हाभर निदर्शने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाकप शिष्टमंडळाकडून कुटूंबियांची भेट व सांत्वन
बीड – सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ.संपदा मुंडे प्रकरणी घोषित केल्याप्रमाणे तात्काळ एसआयटी अधिकारी नियुक्त करून तपासला गती देण्यात यावी, हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शासन करावे. संस्थापक अत्याचाराचे बळी जाण्याचे प्रमाणात वाढ झाली असून राज्यात कायद्या आणि सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडालेला आहे. डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येकाला कठोर शासन करावे या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जिल्ह्यात सर्वच तालुक्यात निदर्शने करण्यात येणार आहेत.रविवार दि 26 रोजी माकप चे राज्य कमिटी सदस्य कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ.बब्रुवान पोटभरे, कॉ.रोहिदास जाधव यांच्यासह जिल्हा कमिटीचे विविध पदाधिकारी यांनी मुंडे कुटूंबियांची भेट घेतली.
आत्महत्या केलेल्या महिला डॉ. संपदा मुंडे ह्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील रहिवासी असून त्यांनी माझ्यावर अन्याय होत आहे मी आत्महत्या करेल अशी वरिष्ठांकडे तक्रार पण केली होती परंतु वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले. राज्यात संस्थात्मक अत्याचाराचे बळी जाण्याचा प्रकार ह्या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. पीडितेला न्याय मिळावा यासाठी घोषणा केल्याप्रमाणे तात्काळ एसआयटी समिती नेमून अधिकारी नियुक्त करण्यात यावे. तपास वेगाने करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे.सर्व आरोपींवर कठोर शासन करावे या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीड जिल्हा कमिटी मंगळवार दि 28 रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती माकप जिल्हा पदाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.