Breaking

डॉ. रावसाहेब कसबे हस्ते तर राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत डॉ. वासुदेव मुलाटे यांना पुरस्कार प्रदान होणार

Updated: सप्टेंबर 17, 2025

By Vivek Sindhu

भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०२५

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई – यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व साहित्याचे अभ्यासक डॉ. वासुदेव मुलाटे यांना महाराष्ट्रातील थोर विचारवंत व महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व बीडचे माजी.आमदार राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येईल अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.
शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. सुसंकृत राजकारणी, साहित्य, क्रीडा, संगीत, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रातील एका मान्यवरास हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. वासदेव मुलाटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार, २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. वासुदेव मुलाटे हे एक महत्वाचे लेखक मराठी साहित्याच्या विश्वासात बीड जिल्ह्याने दिले आहेत. अंधाररंग, अबॉर्शन आणि इतर कथा, काळोखवेणा, झाड आणि समंध, व्यथाफूल हे कथा संग्रह व मराठवाड्याची कथा, ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास हे ग्रंथ आहेत. उलगुलान आणि तडजोड: एक आकलन, ग्रामीण साहित्य चळवळ एक ध्यासपर्व, ग्रामीण साहित्य : स्वरूप व दिशा, ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा, चिंतनाच्या क्षितिजावर, झाकोळलेल्या वाटा हे आत्मकथन, दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप, नवे साहित्य नवे आकलन, बिंब प्रतिबिंब, मनातलं आभाळ – ललित लेख, विषवृक्षाच्या मुळ्या – कादंबरी, शेतकऱ्यांचा असूड, शोध जाणिवांचा ही समीक्षात्मक, संशोधनात्मक ग्रंथा बरोबरच हार्ट क्रॅकर – विनोदी एकांकिका त्यांनी लिहिली आहे. असा एक महत्वाचा लेखक माजलगावच्या मातीत जन्मला, अमळनेरच्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
या पुरस्कार वितरण समारंभास अंबाजोगाईतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, डॉ. कमलाकर कांबळे, सतीश लोमटे, प्रा सुधीर वैद्य, प्रा. भगवान शिंदे, डॉ. प्रकाश प्रयाग, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, त्र्यंबक पोखरकर मार्गदर्शक भगवानराव शिंदे बप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे.

Categories

Recent Posts