Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

दिव्यांग व्यक्तीला फरशीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

एसटी चालकाला मारहाण; बसची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पिंपळनेर: पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून एका दिव्यांग व्यक्तीला फरशीच्या तुकड्याने तोंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना नाथापूर येथे घडली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी मीरा बापू गांडगे (वय ३२, रा. नाथापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती डाव्या हाताने अपंग आहेत. आरोपी रामा भाऊसाहेब चव्हाण (रा. नाथापूर) याने पैसे देणे-घेण्याच्या वादातून फिर्यादीच्या पतीला ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गाठले. तिथे पडलेला फरशीचा तुकडा घेऊन त्याने फिर्यादीच्या पतीच्या तोंडावर जोरात मारल्याने ते जखमी झाले आहेत.

पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शेळके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts