Breaking

डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाल्याने यापुढे डीजे न लावण्याचा केजच्या युवकांचा निर्धार

Updated: नोव्हेंबर 5, 2025

By Vivek Sindhu

यापुढे डीजे न लावण्याचा केजच्या युवकांचा निर्धार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज शहरातील समर्थ नगर भागातील आकाश संतोष लांडगे या २३ वर्षीय तरुणाचे बीड तालुक्यात एका कार्यक्रमात डीजेच्या आवाजाने हृदयविकाराच्या झटक्याने काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. श्रद्धांजली कार्यक्रमात शहरातील युवकांनी यापुढे डीजे न लावण्याचा निर्धार केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने डीजे, डॉल्बीवर बंदी घातली असताना तरुणाईला कर्णकर्कश आवाजाच्या डीजेचे आकर्षण आहे. मात्र एका कार्यक्रमात डिजेमुळे आकाश लांडगे या तरुणाचा बळी गेल्याने केज शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आकाश लांडगे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी भावूक होऊन यापुढे केज शहरात ‘डॉल्बी’ डीजे वाजवणार नाही, असा सामूहिक संकल्प केला आहे. डॉल्बीच्या ध्वनी प्रदूषणाचे आणि आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन युवकांनी हा धाडसी व स्तुत्य निर्णय घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हारुण इनामदार, नगराध्यक्षा सिता बनसोड, हनुमंत भोसले, भाई मोहन गुंड, अशोक सोनवणे, विजय आरकडे, लक्ष्मण जाधव, शकिल सय्यद, धनंजय घोळवे यांच्यासह नागरिक व तरुण उपस्थित होते.


Categories

Recent Posts