Breaking

धारूर पोलीसांची विशेष मोहीम; दोन दिवसांत ३८ केसेस, ३१ हजार ९०० रुपयांचा दंड

Updated: ऑक्टोबर 11, 2025

By Vivek Sindhu

धारूर पोलीसांची विशेष मोहीम; दोन दिवसांत ३८ केसेस, ३१ हजार ९०० रुपयांचा दंड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

किल्लेधारूर – धारूर पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच वाहनधारकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत (ता.१०) रोजी टोल नाका, धारूर येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईत २२ गुन्हे दाखल करून २२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच (ता.११) रोजी झालेल्या नाकाबंदीत १६ गाड्यांवर कार्यवाही करत ९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मोवाका कलम १८५ अंतर्गत एक गुन्हा करण्यात आला आहे.या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास वागमोडे,पुरी,शेख,काळे आदी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, सुरक्षितपणे वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.


Categories

Recent Posts