Breaking
Updated: सप्टेंबर 22, 2025
धनगर समाज बांधवांचा तहसिलवर धडकला मोर्चा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – धनगर समाजास अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी केज तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
केज तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी सोमवारी सकाळी ११.३० वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहापासून मोर्चाला सुरुवात केली. कपाळावर भंडारा लावून गळ्यात पिवळे गमजे घालून समाज बांधवांनी “”आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं””, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजेच, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तर छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचा जयघोष करीत मोर्चा मुख्य रस्त्यावरून कानडी चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार राकेश गिड्डे यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून मागण्या शासनास कळवू, अशी ग्वाही दिली. या मोर्चात बालासाहेब दोडताले, प्रकाश दाडकर, बालासाहेब गाढवे, मधुकर निंगुळे, देवा कांबळे, सचिन रोडे, राजाभाऊ डुकरे, अशोक रोडे, बालु चादर, बबलू रोडे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.