Breaking
Updated: ऑक्टोबर 1, 2025
धनगर समाज बांधव मेंढ्या घेऊन रस्त्यावर ; अर्धा तास केला रास्ता रोको
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – धनगर समाजास अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी केज तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव महिला, मुलांसह मेंढ्या घेऊन बुधवारी सकाळी ११ वाजता रस्त्यावर उतरले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
केज तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी महिला, मुलांसह मेंढ्या घेऊन बुधवारी सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. रास्ता रोको आंदोलन करीत धनगर समाज बांधवांनी कपाळावर भंडारा लावून गळ्यात पिवळे गमजे घालून “”आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं””, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजेच, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या मोर्चात बाळासाहेब गाढवे, अविनाश धायगुडे, प्रकाश जाडकर, ओम चादर, अंगद गाढवे, दया घुंडरे, रणजीत खोडसे, तात्या रोडे यांच्यासह नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.