Breaking

राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार जाहीर ; बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया तर्फे मान्यवरांचा सन्मान

Updated: सप्टेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार जाहीर ; बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया तर्फे मान्यवरांचा सन्मान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त २ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे धम्म महोत्सवाचे आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित ५ वा राज्यस्तरीय धम्म महोत्सव यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरूवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपन्न होणाऱ्या या धम्म महोत्सवात एकूण ४ सत्र आहेत. पहिले सत्र सकाळी १० ते ११.३० वाजता या वेळेत होईल. या सत्रात गायक रमेश सरवदे (अंबाजोगाई) व कु.स्नेहा खंडागळे (पुणे) हे भीमसूर्य – बुध्द आणि भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. सत्र दुसरे हे धम्म ध्वजारोहण, उद्घाटन आणि पुरस्कार वितरणाचे असेल, सकाळी ११.३० वाजता खासदार बजरंगबप्पा सोनवणे (बीड लोकसभा) यांच्या शुभहस्ते या धम्म महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई.) तर विशेष अतिथी म्हणून ना.मेघनादिदी साकोरे – बोर्डीकर (राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री परभणी जिल्हा.) तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.विशाल गरड तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, डॉ.नरेंद्र काळे (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), ऍड.अनंतराव जगतकर (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई.), चंद्रशेखर वडमारे (उद्योजक, अंबाजोगाई.), डॉ.अंजलीताई घाडगे (नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार), भाऊसाहेब राठोड (सरपंच, काळवटी तांडा ग्रामपंचायत), नितीन शिंदे (ज्येष्ठ नेते), सुधाताई श्रीपती जोगदंड (सामाजिक कार्यकर्त्या) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी वर्ष २०२५ साठीचे जाहीर करण्यात आलेले राज्यस्तरीय पुरस्कार व मान्यवर पुढीलप्रमाणे आहेत. विद्याभूषण पुरस्काराचे मानकरी प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड (दयानंद महाविद्यालय, लातूर.), प्राचार्य डॉ.एस.एल.कांबळे (हुतात्मा गोविंद पानसरे महाविद्यालय, अर्जापूर.), प्रा.डॉ.भीमराव खाडे (ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी.), उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराचे मानकरी राजेंद्र डोंगरे (मुख्यकार्यकारी अधिकारी, जी-७ गंगाखेड शुगर, गंगाखेड.), उत्कृष्ट समाजसेवा पुरस्काराचे मानकरी राजेश घोडे (आझाद क्रांती सेना, माजलगाव.), उत्कृष्ट संपादक पुरस्काराचे मानकरी संग्राम धन्वे (संपादक, मराठी महाराष्ट्र, बीड.), उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्काराचे मानकरी लखन परळीकर, उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराचे मानकरी संतोष शिरसाट (नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक, धारूर.), आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी पंकज भटकर (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पट्टीवडगाव, अंबाजोगाई.), ग्रामीण रील स्टार पुरस्काराच्या मानकरी सौ.मनिषा हजारे ( ऊसतोड कामगार, वडवणी.) आणि प्राणी मित्र पुरस्काराचे मानकरी सिद्धार्थ सोनवणे (शिरूर कासार) हे आहेत. सत्र तिसरे धम्म प्रवचनाचे आहे. या सत्रात भन्ते पय्यानंद थेरो (लातूर), भन्ते धम्मसार (किल्लारी) आणि भन्ते सुमंगल थेरो (उमरगा) हे उपस्थित धम्म उपासक व उपासिका यांना धम्मदेसना देतील. सत्र चौथे गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि विशेष व्याख्यानाचे असेल, या सत्राच्या अध्यक्षस्थानी आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा (केज विधानसभा मतदारसंघ) या असतील. यावेळी प्रख्यात व्याख्याते इतिहासकार केशव वाघमारे, करूणा कांबळे (जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, लातूर.) यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून डॉ.एम.व्ही.कानेटकर (प्राचार्य, योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई.), महादू मस्के (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई.), शैलेश कांबळे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, बीड.), ऍड.माणिक आदमाने (प्रदेश सचिव, बी.आर.एस.पी, महाराष्ट्र राज्य.), दशरथ सोनवणे (तालुकाध्यक्ष, आरपीआय-ए), महादेव आदमाने (माजी नगरसेवक), संतोष शिनगारे (माजी नगरसेवक), प्रा.डॉ.मकरंद जोगदंड, डॉ.सिध्दार्थ टाकणखार (प्रदेश सचिव, आझाद समाज पक्ष.) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे समाजकार्यासाठी कार्यरत मान्यवरांचा सन्मान आणि धम्मकार्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने हे आहे. या धम्म महोत्सव सोहळ्याबाबत बोलताना बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया संस्थेचे सचिव डॉ.कमलाकर कांबळे म्हणाले की, हा उपक्रम समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना एकत्र आणणारा व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि धम्मकार्यासाठी हा सोहळा महत्वाचा ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. असे सांगून फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित सर्व कार्यकर्ते आणि बौद्ध उपासक, उपासिका व बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या धम्म महोत्सवात उपस्थित राहण्याची हार्दिक विनंती व आवाहन बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येत आहे.


Categories

Recent Posts