Breaking

जलजीवनच्या विरुद्ध सोनीजवळ्याच्या महिलांचा हंडा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला

Updated: एप्रिल 6, 2026

By Vivek Sindhu

नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची केली मागणी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची केली मागणी

केज :- जलजीवन योजनेचे ळाद्वारे घरोघरी पाणी पुरवठा करण्यात यावा. जलजीवन मिशनचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागण्यासाठी केज तालुक्यातील सोनीजवळा येथील महिलांनी ग्रामपंचायत सदस्य मिनाज पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. 

३० वर्षां पूर्वीची केज – धारूर शहरासह बारा गाव पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाल्याने सोनीजवळा गावाला पाणी पुरवठा होत नाही. तर या गावाला जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत ४ कोटी १३ लाख रुपयांच्या नळ योजनेचे काम संबंधित गुत्तेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही. त्यामुळे संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा. त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली असून २ कि. मी. अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. पाणी आणताना महिला व वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य मिनाज पठाण यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी त्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारत तात्काळ पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मोर्चात देविदास जोगदंड, सत्तर शेख, धनराज कांबळे, श्रीधर वैरागे, अमोल राऊत, जुनेद शेख, खलील शेख, सुरज उजगरे, गौतम जोगदंड, सज्जाद शेख, रफिक शेख, दुसेन पठाण, रोहित जोगदंड, विनोद महाजन यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Categories

Recent Posts