Breaking
Updated: ऑक्टोबर 25, 2025
दाम्पत्याचे डोके फोडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – तांबवा येथील सिंधू उद्धव भालेकर व त्यांचे पती उद्धव भालेकर हे दोघे २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता शेतात होते. उद्धव हे पाणी आणण्यास गेले असता कैलास महादेव भालेकर, विलास महादेव भालेकर, महादेव गणपती भालेकर या तिघांनी जुन्या भांडणाचे कारण काढून सिंधू यांना शिवीगाळ करीत कोयत्याच्या मुठीने डोक्यात मारून डोके फोडले. त्यांना चापटाबुक्याने मारहाण केली. त्यांचे पती उद्धव हे आले असता त्यांना कोयत्याच्या मुठीने डोक्यात मारून डोके फोडले. लोखंडी गजाने पाठीत मारहाण करीत अंगावर गाडी घालून जीवे मारण्याची धमकी ही दिली. सिंधू भालेकर यांच्या तक्रारीवरून कैलास भालेकर, विलास भालेकर, महादेव भालेकर या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण हे करीत आहेत.