धारूर : तालुक्यातील आरणवाडी शिवारात चुलत भावंडांमध्ये वाद होऊन दगडाने मारहाण, शिवीगाळ आणि जीव घेण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. ३ ऑगस्ट) सायंकाळी घडली. या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.