Breaking
Updated: June 20, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupलहान कारणाने होणाऱ्या शेतीच्या वादाला चर्चेतून मिटवा : देविदास वाघमोडे
धारूर – मान्सूनपूर्व कालावधीत शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असताना जमिनीच्या मालकी हकावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. या वादांमधून गंभीर गुन्ह्यांची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ‘पोलीस आपल्या बांधावर’ हा अभिनव उपक्रमाच्या अनुषंगाने धारूर येथील पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचा प्रश्न निकाली लावून या उपक्रमाची सुरुवात केल्याने सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ‘पोलिस आपल्या बांधावर’ हा शेतकऱ्याच्या हिताचा उपक्रम सुरू करून एक वाद होण्याअगोदर वाद आपसांत मिटवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे शेतजमिनीशी संबंधित वाद निर्माण होताच पोलिस यंत्रणा तत्काळ सजग होऊन त्या वादात सामंजस्य व कायदेशीर मार्गदर्शनाच्या आधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी संवाद साधून, बीट अंमलदारांच्या मदतीने प्रत्यक्ष बांधावर भेट देत वस्तुस्थितीची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर धारूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी या उपक्रमाची सुरुवात करत. धारूर येथील शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्याचा वाद सुरू होता रस्त्यामुळे अमोल जगताप यांच्या शेतामध्ये पाणी साचून शेतीचे नुकसान होत होते त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता.