Breaking

चोरट्यांनी भरदिवसा फोडले घर

Updated: ऑक्टोबर 13, 2025

By Vivek Sindhu

केज येथील रास्ता रोको प्रकरणी बाळराजे आवारेसह ३३३ जणांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार – तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत घरातील ५०,००० हजार रुपयांचा एवज लंपास केल्याची घटना शनिवार (दि.१०) रोजी भरदिवसा घडली असून शिरूर कासार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथील अभिमाबाई बाबासाहेब खेडकर (वय ६०) ह्या शेतात काम करत असताना त्यांच्या घराचा दरवाजा शनिवार (दि.११) रोजी ०५.३० च्या सुमारास भरदिवसा तोडून कपाटातील 50,000 रुपये लंपास केल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.


Categories

Recent Posts