Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अंबाजोगाईत शोकसभेचे आयोजन

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

IMG 20260129 WA0038

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या पालकमंत्र्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अंबाजोगाई शहर आणि तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवारी ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अंबाजोगाई येथील वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासकामांत अजित पवार यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईतील सर्व स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन ही सभा आयोजित केली आहे. या सभेला सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन समस्त अंबाजोगाईकरांच्या वतीने करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts