Breaking
Updated: मार्च 2, 2026
लव्हुरी येथे दोन गटात हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – लव्हुरी ता. केज येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारीवरून केज पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे आहेत.
लव्हुरी येथील गीताबाई साहेबराव चाळक (वय ४०) या २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शेतात असताना त्यांना पोलिसात आमच्या विरोधात तक्रार का केली असे म्हणत सार्थक बाबासाहेब खांडेकर, बाबासाहेब जनार्धन खांडेकर, जनार्धन मारोती खांडेकर, पद्मा बाबासाहेब खांडेकर, कलावती जनार्धन खांडेकर या पाच जणांनी शिवीगाळ करीत गीताबाई चाळक यांना लाथाबुक्यांनी, दगडाने, काठीने मारहाण केली. तर मुलासह नाताच्या हाताला चावा घेऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गीताबाई चाळक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटाच्या पद्मजा बाबासाहेब खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये पद्मजा खांडेकर आणि त्यांचे पती बाबासाहेब खांडेकर यांना बाबासाहेब हनुमंत साहेबराव चाळक, श्रीमंत साहेबराव चाळक यांनी लाकडी काठीने मारहाण केली. तसेच हरीओम हनुमंत चाळक, शिला हणुमंत चाळक, शिल्पा श्रीमंत चाळक, विठाबाई साहेबराव चाळक यांनी देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
पद्मजा खांडेकर यांच्या तक्रारी वरूनबाबासाहेब हनुमंत साहेबराव चाळक, श्रीमंत साहेबराव चाळक हरीओम हनुमंत चाळक, शिला हणुमंत चाळक, शिल्पा श्रीमंत चाळक, विठाबाई साहेबराव चाळक सहा जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास पोलिस जमादार पुरुषोत्तम शेप हे करीत आहेत.