Breaking
Updated: फेब्रुवारी 2, 2026
केज येथे मूकनायक दिन साजरा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबाबुराव गालफाडे यांनी पत्रकारांना भारतीय संविधानाची प्रत भेट
केज :- केज येथे सर्व पत्रकारांच्या वतीने मूकनायक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव गालफाडे यांनी पत्रकारांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन गौरव केला
या बाबतची माहिती अशी की, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी केज येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प्रकांड कायदेपंडित, अर्थ तज्ज्ञ आणि उपेक्षितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले होते. त्या निमित्त केज येथील पत्रकार बांधवांनी शासकीय विश्रामगृह येथे मूकनायक दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे हे होते. तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विजयराज आरकडे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, गौतम बचुटे, अजय भांगे, स्वाभिमानी पत्रकार संघाचे चंद्रकांत पाटील, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजीत घाडगे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी, तात्या गवळी, महादेव काळे, प्रदीप गायकवाड, मनोरम पवार, सन्नी शेख, जयद्रथ गायकवाड, दिनकर जाधव, यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम बचुटे यांनी तर आभार विजयराज आरकडे यांनी यांनी व्यक्त केले.
बाबुराव गालफाडे यांची पत्रकारांना अनोखी भेट :- दलित चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी पत्रकारांना भारतीय संविधानाच्या प्रति भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
अजित पवार आणि विमान दुर्घटनेतील मयतांना श्रद्धांजली :- विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या सर्वांना प्रकार बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली.