Breaking

व्यापाऱ्याचा मोबाईल आणि पैसे हिसकावून नेले : दोघांवर गुन्हा दाखल

Updated: मार्च 24, 2026

By Vivek Sindhu

केज येथे महावितरणच्या विरोधात लोंढे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज :- दुचाकी वरून आलेल्या दोघांनी एका व्यापाऱ्याचा मोबाईल व नगदी दोन हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना केज शहरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

केज शहरातील समता नगर भागातील व्यापारी बाळासाहेब सोपानराव घुले हे २३ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत त्यांच्या दुकानाकडे पायी जात असताना दुचाकी वरून आलेल्या दोघांनी त्यांना दुचाकी आडवी लावली. त्यांच्याकडे रागाने बघत १० हजार रुपयांचा मोबाईल व २ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन निघून गेले. 

व्यापाऱ्याने ही माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेची तपासणी केली असता सराईत गुन्हेगार आवड्या उर्फ आवेज शेख (रा. कोकीजपिर, केज), सोहेल मोहम्मद शेख (रा. अजीजपुरा, केज) या दोघांनी मोबाईल व पैसे हिसकावून नेल्याचे स्पष्ट झाले. 

बाळासाहेब घुले यांच्या फिर्यादी वरून आवड्या उर्फ आवेज शेख, सोहेल मोहम्मद शेख या दोघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं.  १४९/२०२६ भा. न्या. सं. ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे पुढील तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts